बीड

संतापजनक घटना! दिव्यांग बहिणीवर भावाने केला अत्याचार

बीड जिल्ह्यातील परळी येथे घडली घटना

8 Feb :- अनेक नात्यांमध्ये प्रेम आणि जिव्हाळ्याचं नातं असतं ते म्हणजे बहीण आणि भावाचं. बहिणीकडे कोणा पर पुरुषाची वक्र दृष्टी जरी पडली तर तळ पायाची आग मस्तकाला जाते. मात्र याच बहिणेकडे भावाने नजर फिरवावी ही अत्यंत संतापजनक बाब आहे. अशीच एक संतापजनक घटना बीड जिल्ह्यातील परळी येथे घडली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना परळी तालुक्यात उघडकीस आली आहे. चुलत भावाने दिव्यांग बहिणीवर बळजबरीने अत्याचार केला. ५ फेब्रुवारीची ही घटना असून आरोपी फरार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ग्रामीण ठाणे हद्दीतील ३० वर्षीय पीडित तरुणी दिव्यांग आहे.५ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता ती आपल्या घरी होती.

यावेळी तिचा चुलतभाऊ घरात शिरला. त्याने सुरुवातीला तिची छेड काढली व नंतर बळजबरीने अत्याचार केला. यानंतर तो पसार झाला. पीडितेने घडला प्रकार कुटुंबाला सांगितला. त्यानंतर त्यांनी ग्रामीण ठाणे गाठून फिर्याद दिली. विनयभंग, बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंद झाला असून तपास सहायक निरीक्षक प्रताप नवघरे करत आहेत.