लॉजवर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या मालकाचा पर्दाफाश
पोलिसांनी महिलेसह पकडले रंगेहाथ
7 Feb :- पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा चौकातील पुणे-नगर रोडच्या लगत असणाऱ्या वृंदावन लॉजवर वेश्या व्यवसायाचा रांजणगाव MIDC पोलिसांनी छापा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आली असून एका महिलेच्या मदतीने ते वेश्या व्यवसाय करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रांजणगाव गणपती येथील राजमुद्रा चौकात असणाऱ्या हॉटेल वृंदावन येथे वेश्या व्यवसाय चालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
त्यानंतर आज (दि 7) रोजी मध्यरात्री 1 च्या सुमारास पोलिसांनी एका व्यक्तीला बनावट गिऱ्हाईक म्हणून लॉजवर पाठवले असता त्या व्यक्तीने हॉटेल वृंदावन येथील मॅनेजर गुणाकार शेट्टी यास शारीरिक संबंधाकरीता महिलेची मागणी केली. त्यावेळी गुणाकार शेट्टी आणि लालासो शेंडगे यांनी त्यास हॉटेलमधील एका खोलीत जायला सांगितले. त्यावेळेस त्या बनावट गिऱ्हाईकाने हॉटेलच्या बाहेर येऊन पोलिसांना इशारा केला.
त्यावेळेस पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला असता तिथे वेश्याव्यवसाय करणारी पीडित महिला आढळून आली. त्यावेळेस तिच्याकडे अधिक चौकशी केली असता. गुणाकार कृष्णपा शेट्टी (वय 46) रा. वृंदावन लॉज, रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे तसेच लालासो दत्तात्रय शेंडगे (वय 30) रा. शेळकेवाडी शिवणे, ता. सांगोला, जि. सोलापूर या दोघांनी संगनमताने त्या पीडित महिलेस स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी हॉटेल वृंदावन येथे ठेऊन तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत असल्याचे निष्पन्न झाले असून या दोघांवर अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या आदेशानुसार रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, उपनिरीक्षक संदीप येळे, पोलीस नाईक विनायक मोहिते, पोलीस शिपाई रघुनाथ हळनोर, धनश्री जाधव, विजय शिंदे यांनी ही धडक कारवाई केली.