News

पिले पिले ओ मेरे राजा…. बीडच्या मद्यप्रेमींसाठी खुशखबर

जिल्ह्यातील मद्यप्रेमींसाठी आता खुशखबर. जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज जाहीर केलेल्या पत्रकामध्ये जिल्ह्यातील वॉईनशॉप, देशीदारू दुकाने, बिअरशॉपी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. कंटेनमेंट झोन आणि बफर झोनमधील दारू दुकाने मात्र बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले आहे. शहर आणि जिल्ह्यातील बिअरबार-परमीटरूम मात्र बंद राहणार आहेत. फक्त सीलबंद बाटलीतूनच मद्यविक्रीची परवानगी देण्यात आल्याचेही पत्रकात म्हटले आहे.