बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; आज आढळले केवळ ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

7 Feb :- बीड जिल्ह्यात अधून मधून कोरोना रूग्णवाढीत होणारे चढ-उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज रविवारी 427 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 404 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आज केवळ 23 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अंबाजोगाई-8, आष्टी-5, बीड-4, परळी-4, तर धारूर,केज येथे प्रत्येकी कोरोना रुग्ण आढळला आहे. रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे.