मोठी आपत्ती! उत्तराखंडमध्ये कोसळला हिमकडा; धरणाचा बांध तुटला
अनेकांचा मृत्यू झाल्याचा संशय
7 Feb :- उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळल्याने धरणाचा बांध तुटला आहे. राज्याच्या चमोलीमध्ये ही घटना घडली. यामुळे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जिल्ह्याच्या रैणी गावाजवळ धरणाचा बांध फुटला. प्रशासनाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. यामध्ये अनेक घरांचे नुकसान झाले असून, ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टचे मोठे नुकसान झाले आहेत. तसेच, येथील 100-150 जणांचा मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त होत आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
उत्तराखंडचे महासचिव ओमप्रकाश यांनी सांगितले की, दुर्घटनेमध्ये 100 ते 150 लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. चमोलीच्या तपोवन परिसरात झालेल्या या घटनेने ऋषिगंगा पॉवर प्रोजेक्टला प्रचंड नुकसान पोहोचले आहे. येथे काम करणारे अनेक मजूर बेपत्ता आहेत.
नदीच्या किनाऱ्यावरील अनेक घरे ही पाण्यात वाहून गेली आहेत. आजुबाजूची गावे रिकामी करण्यात आली आहेत. ऋषिगंगा व्यतिरित्त एनटीपीसीच्या एका प्रोजेक्टलाही नुकसान पोहोचले आहे. तपोवन बैराज, श्रीनगर डॅम आणि ऋषिकेश धरणाचेही नुकसान झाले आहे.