बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; आज ‘इतक्या’ रुग्णांना झाली कोरोनाची लागण

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

6 Feb :- बीड जिल्ह्यात अधून मधून कोरोना रूग्णवाढीत होणारे चढ-उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज शनीवारी 475 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 457 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आज केवळ 18 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

अंबाजोगाई-2, आष्टी-3, बीड-10 तर परळी येथे प्रत्येकी 3 कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे.