बीड

गेवराईतील युवकाची निर्घृण हत्या

रावेर जिल्हा जळगाव येथे झाला खुन

5 Feb :- टपरी फोडण्याच्या संशयावरूण गेवराईतील चिंतेश्वर भागात रहिवासी असलेला सौरभ गणेश राऊत या १९ वर्षीय भोळसर युवकाचा दि. ३ रोजी रावेर जिल्हा जळगाव येथे खुन झाल्याची घटना घडली आहे. या युवकांचा चार जणांनी दोरीने गळा आवळून खुन केला असल्याची माहीती जळगावचे पोलीस अधीक्षक मुंडे यांच्याकडून प्राप्त झाली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

यापुर्वी देखील त्याला कर्नाटक आणि सुरत येथून नातेवाईकांनी शोधून आनले होते परंतू गेल्या दोन महिन्यापासुन हा युवक घरातून निघून गेला असल्यांची माहिती आहे दि ४ रोजी नातेवाईक यांना रावेर पोलीसांनी एका अनओळखी मृत्युदेह ओळखण्यासाठी बोलवले असता तो हाच तरूण आहे यांची खात्री पटली आहे.

नायलोनच्या दोरीने गळा आवळला असल्याचा वैधकीय अहवाल नुसार शरातील सिसीटिव्ही फुटेज बारकाईने तपास केल्यानंतर चार संशयीत आरोपी पकडण्यात रावेर पोलीसांना यश आले. या घटनेचे माहिती गेवराई शहरात पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे.