बीडमध्ये रुग्णवाढीत ‘मोठी’ भर तर ‘इतके’ रुग्ण झाली कोरोनामुक्त
बीड जिल्ह्याचं सविस्तर कोरोना अपडेट
5 Feb :- बीड जिल्ह्यात अधून मधून कोरोना रूग्णवाढीत होणारे चढ-उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज शुक्रवारी 536 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 503 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर आज तब्बल 33 जणांना कोरोनाची लागण झाली आहे तर आवाज संपूर्ण बीड जिल्ह्यातून 30 रुग्णांना कोरोनामुक्तीची पावती भेटली आहे.
अंबाजोगाई-3, आष्टी-2, बीड-21, धारूर, गेवराई, वडवणी येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर केज आणि परळी येथे प्रत्येकी 2 कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे.