बीड

बिबट्या गेला अन वाघ आला? बीडमध्ये ‘या’ गावात झाले वाघाचे दर्शन?

ग्रामस्थांनी काढली रात्र जागून

4 Feb :- बिबट्याच्या दहशतीने गेली अनेक दिवस ग्रामीण भाग जीव मुठीत घेऊन जगत होता. बिबट्याने अनेक जणांच्या नरडीचा घोट घेऊन ग्रामीण भागात दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. बिबट्याचा अध्याय संपताच आता आणखी थक्क करणारी धक्कदायक गोष्ट समोर आली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

परळी-तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या मालेवाडी गावांमध्ये बुधवारी रात्री ९.३० च्या सुमारास काही ग्रामस्थांना वाघाचे दर्शन झाल्याची माहिती समोर आली आहे. सदरील प्राणी कोणता होता याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. परंतु वाघाच्या भीतीने गावकऱ्यांनी संपूर्ण रात्र ताटकळत जागून काढली.

कडाक्याची थंडी असल्याने काही जण शेकोटी पेटवून बसले असताना शेळ्यां बांधलेल्या ठिकाणाकडे वाघ जात असल्याचे आढळून आले. आरडाओरडा केल्यानंतर वाघ निघून गेला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.सरपंच भुराजी बदने यांनी याबाबत वन विभागाला माहिती दिली असून वन विभागाचे कर्मचारी प्राण्याच्या पायाचे ठसे घेण्यासाठी रवाना झाल्याची माहिती मिळाली आहे.