भारत

‘या’ कारणामुळे ‘लाल किल्ला’ अनिश्चीत काळासाठी बंद

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिला आदेश

3 Feb :- देशातील महत्वाच्या ऐतिहासिक इमारतींपैकी एक असलेला ‘लाल किल्ला’ हा फक्त भारतातील नाही तर जगभरातील पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण आहे. परंतु लाखो पर्यटकांचे आकर्षण असणारा लाल किल्ला अनिश्चीत काळासाठी बंद करण्यात आला आहे. कारण भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार किल्ला बंद करण्यात आले आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार बर्ड फ्लूचा वाढता संसर्ग लक्षात घेता पुढील आदेश येईपर्यंत लाल किल्ला सामान्य पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने एएसआयला पत्र लिहिल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ला 22 ते 26 जानेवारी दरम्यान बंद होता.

26 जानेवारीला झालेल्या हिसेंनंतर एएसआयने 31 जानेवरीपर्यंत बंद करण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी देखील एएसआयने बर्ड फ्लूचे कारण दिले होते. 1 फेब्रुवारीला एएसआयने दिलेल्या आदेशानुसार लाल किल्ला संक्रमित क्षेत्रामध्ये येत असल्याने बर्ड फ्लूचा फैलावर रोखण्यासाठी सामान्य नागरिकांसाठी लाल किल्ला बंद करण्यात आला आहे. बर्ड फ्ल्यूचा उगाच बाऊ करू नका, यानं माणसं मरत नाही.

बर्ड फ्ल्यू असेल तिथे एक किलोमीटरचा परिसर सिल करायला सांगितला आहे. बर्ड फ्ल्यूचा प्रसार होणार नाही याची काळजी घेत आहोत. बर्ड फ्ल्यू परदेशातील पक्षांकडून आला आहे. चिकन, अंडी रोज खा. 70 अंश सेल्सिअर तापमानावर त्याला अर्धा तास शिजवा आणि आरामात खा. चिकन, अंडी खाल्याने कोरोनावर मात करण्याची शक्ती मिळते, असं मंत्री सुनील केदार म्हणाले आहेत.