भारत

प्लॅस्टिकच्या पिशवीत सापडला माणसाचा मृतदेह; अन उडाली खळबळ

गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी येथे घडली घटना

3 Feb :- भर दुपारी एका प्लॅस्टिकच्या पिशवीत मृतदेह सापडल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि एकच खळबळ उडाली. एका नाल्यात कुजलेल्या अवस्थेत हे अवशेष सापडले होते आणि त्याचा शोध घेण्याचं नवं आव्हान पोलिसांनी पेललं गाझियाबाद जिल्ह्यातील लोणी येथील डाबर तालाब भागात एका नाल्यात एका माणसाचा अर्धा मृतदेह सापडला आहे. ही माहिती मिळताच जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टसाठी पाठवला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अशी भीती व्यक्त केली जात आहे की 20 ते 25 दिवसांपूर्वीच दरोडेखोरांनी या तरुणाला मारून त्याचे तुकडे केले असावेत. पोलिस बाकीच्या शरीराचा शोध घेत आहेत. लोणी क्षेत्राधिकारी अतुलकुमार सोनकर म्हणाले की, बुधवारी दुपारी सुमारे 11 च्या आसपास प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. ही बातमी मिळताच ते लगेचच घटनास्थळी पोहचले आणि नाल्यातून मृतदेह बाहेर काढयला सांगितला.

पोतं उघडताच त्यातून मृतदेहाच्या छातीखालील भाग आणि त्याचे पाय legs आढळले. लगेचच ही माहिती उच्चाधिकाऱ्यांपर्यंत पोचवण्यात आली आणि मिळालेला शरीराचा भाग पोस्टमॉटर्मसाठी postmortem पाठवण्यात आला. पोलिस अधिक्षक ईराज राजा म्हणाले की या व्यक्तीची 20 ते 25 दिवसापूर्वीच हत्या झाली असावी. ही हत्या कुठंतरी वेगळ्याच ठिकाणी झाली आहे आणि दरोडेखोरांनी हा मृतदेहाची विल्हेवाट वेगळ्याच ठिकाणी लावली आहे. आतापर्यत मृतदेहाचा एकच भाग सापडला आहे.

उर्वरीत भागाचा शोध घेतला जात आहे पोलिसांनी सांगितले, की ज्या प्रकारे मृतदेह कापला गेला आहे, ते पाहता त्याला मोठ्या आणि धारदार शस्त्राने कापलं गेलं असावं. शरीर कापायला धारदार आरीचा वापर केला गेला आहे असं दिसतं. पोलिस अधीक्षक म्हणाले की, जिथे हा मृतदेह सापडला आहे, तो भाग दिल्लीपासून परिसराला लागून आहे. त्यामुळे हा खून दिल्लीत घडला असावा.

पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी गाझियाबादच्या सर्व पोलिस ठाण्यांसह दिल्लीच्या सीमा पोलिस ठाण्यांना माहिती दिली आहे. या सर्व पोलिस स्टेशन भागात हरवलेल्या लोकांचा तपशील शोधला जात आहे. ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी सांगितलं, की हा मृतदेह फार पूर्वी इथं ठेवला गेला असावा. आता केवळ सीसीटीव्हीतून काही पुरावे मिळतील अशी अपेक्षा आहे.