बिग बॉसमध्ये झळकलेल्या स्वामी ओम यांचं निधन
गेल्या काही दिवसांपासून होते आजारी
3 Feb :- बिग बॉसच्या एका सीझनमध्ये स्पर्धक म्हणून उतरलेले स्वामी ओम यांचं पॅरालिसिसमुळे निधन झालं आहे. Bigg Boss मध्ये वादग्रस्त वर्तन केल्यामुळे ते चर्चेत होते. हा रिअॅलिटी शो त्यांना अर्धवट सोडून द्यावा लागला होता. स्वामी ओम गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
तीन महिन्यांपूर्वी त्यांना कोरोनाचं निदानही झालं होतं. त्या वेळी ते या विषाणूवर मात करत बरे झाले होते. पण त्यातून आलेला अशक्तपणा कमी झालेला नव्हता. त्यातच 15 दिवसांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. त्यात त्यांचं अर्ध शरीर जायबंदी झालं. दिल्लीतल्या AIIMS मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.
आज सकाळी त्यांनी तिथेच शेवटचा श्वास घेतला. 2017 मध्ये खासगीपणाच्या अधिकाराची पायमल्ली केल्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने स्वामी ओम यांना 10 लाख रुपयांचा दंड होता. याशिवाय अनेक वादग्रस्त वक्तव्यांसाठी स्वामींचं नाव चर्चेत होतं. बिग बॉसच्या 10 व्या हंगामात Bigg boss season १० ते स्पर्धक म्हणून दिसले. पण त्यांना या शोमधून नंतर काढून टाकण्यात आलं होतं.