राजकारण

दुःखद! शिवसेनेच्या ‘या’ आमदाराचे अल्पशा आजाराने निधन

शिवसेनेचे होते पहिले आमदार

3 Feb :- जळगाव जिल्ह्यातून शिवसेनेचे प्रथम आमदार हरीभाऊ आत्माराम महाजन यांचं निधन झाले आहे. अल्पशा आजाराने त्यांनी अखेरच श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हरीभाऊ आत्माराम महाजन यांचे रात्री एक वाजता निधन झाले. हरीभाऊ आत्माराम महाजन हे 1990 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन एरंडोल विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते.

शिवसेनेचे प्रथम आमदार हरीभाऊ आत्माराम महाजन

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

महाजन जिल्ह्यातील शिवसेनेचे पहिले आमदार होते. नंतर मात्र राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासह त्यांनी पक्षाची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या मृत्यूमुळे धरणगावसह परिसरावर शोककळा पसरली असून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. छगन भुजबळ यांनी ट्वीट करून महाजन यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.

‘जळगाव जिल्ह्यातील धरणगाव मतदारसंघाचे माजी आमदार हरिभाऊ महाजन यांचे दुःखद निधन झाले. मतदारसंघाच्या विकासासाठी हरिभाऊ महाजन यांचे मोलाचे योगदान होते. शिवसेनेत असतांना ते माझे सहकारी आमदार होते. मी शिवसेनेमधून बाहेर पडलो तेव्हा ते भक्कमपणे माझ्यासोबत होते’ अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली. तसंच, त्यांच्या निधनाने एक धडाडीचे आणि सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपले आहे. मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत. असं म्हणत दिवंगत आमदार महाजन यांना भुजबळ यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.