Newsबीड

उद्यापासून बीडचे मार्केट सुरू -जिल्हाधिकारी

बीड : जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज बीड जिल्ह्यासाठी नवे आदेश जारी केले आहेत. विविध व्यवसाय व उद्योगांच्या कामकाजाविषयीचे यापुर्वीचे लॉकडॉऊन काळातील सर्व आदेश अधिक्रमीत करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी कळविले आहे.
नव्या आदेशात काय म्हटले आहे?
केवळ खालील बाबी पुढील आदेशापर्यंत जिल्ह्यात प्रतिबंधीत असतील

सर्व
शाळा, कॉलेज, शैक्षणिक प्रशिक्षण, शिकवणी केंद्र बंद राहतील. ऑनलाईन शिक्षण चालू राहील त्यास प्रोत्साहन देण्यात येईल.
सरकारी कर्मचारी, पोलीस, आरोग्य कर्मचारी, अडकलेले व्यक्ती, प्रवासी, अलगीकरण कक्ष, विलगीकरण कक्ष, बसस्थानक, व रेल्वे स्थानकातील हॉटेल उपहारगृह वगळता सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर सेवा देणार्‍या अस्थापना बंद राहतील. रेस्टॉरंटला पार्सल सेवा देण्यासाठी सूट देण्यात येत आहे.
सर्व हॉटेल ढाबे, चाट सेंटर, खानावळींना केवळ घरपोहोच सेवेसाठी परवानगी देण्यात येत आहे.
सर्व सिनेमागृहे, मॉल, व्यायामशाळा, जलतरणिका, मनोरंजन, उद्याने, प्रेक्षागृहे सभागृहे बंद राहतील.
सर्व सामाजिक, राजकीय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्य व जमावास बंदी राहील.
सामान्य नागरिकांसाठी सर्व धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे बंद राहतील.
धार्मिक परिषद, संमेलने जमाव यांना प्रतिबंध करण्यात येत आहे.
क्रिडा संकूले, क्रिडांगणे व सार्वजनिक खुल्या जागा या वैयक्तिक व्यायामासाठी खुल्या राहतील. परंतु प्रेक्षक, सामुहिक क्रिडा, व्यायाम, कृतिंना परवानगी नाही. यावेळी सामाजिक अंतरषियक नियमांचे पालक करण्याच्या अटीवर परवानगी देण्यात येत आहे.
सार्वजनिक व खासगी वाहतूक करताना पुढील नियम

दुचाकी- एक चालक
तीनचाकी- चालक व 2 प्रवाशी
चारचाकी -चालक व 2 प्रवाशी
जिल्हांतर्गत बससेवेला केवळ 50 टक्के प्रवाशी क्षमतेची परवानगी उर्वरित आदेश निर्गमीत करण्यात येतील.
बार व दारू दुकानांचे आदेश स्वतंत्र निर्गमीत करण्यात येतील.
तंबाखूजन्य पदार्थ व विक्री व सार्वजनिक ठिकाणी सेवनास बंदी.

सर्व सलून, ब्यूटी पार्लर तत्सम दुकानांना सुरु करण्यास कोरोनाविषयी स्वच्छतेचे सर्व नियम पाळणे बंधनकारक ठेवून परवानगी देण्यात येत आहे.
कंटेनमेंट व बफर झोनमध्ये कार्यालयाच्या आदेशाप्रमाणेच व्यवसायांना परवानगी राहील.

सायं 7 ते सकाळी 7 दरम्यान अत्यावश्यक सेवेतील व्यक्ती वगळता कोणीही घराबाहेर पडू शकणार नाही.
65 वर्षापेक्षा जास्त वयाच्या व्यक्ती, गर्भवती महिला, 10 वर्षाखालील मुले यांना जिवनावश्यक सेवा व्यतिरिक्त इतर कोणत्याही कारणांसाठी घराबाहेर पडता येणार नाही.
कोणत्याही दुकानात पाच पेक्षा जास्त व्यक्ती असू नयेत. प्रत्येक व्यक्तीत सहा फुट अंतर असावे. याची जबाबदारी दुकानदाराची असेल.
सर्व अस्थापना व दुकाने सकाळी 7ः 30 ते सायंकाळी 6:30 पर्यंत दररोज चालू राहतील.
बँकांचे काम शासनाने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे करावे.
गर्दी झाल्यास सोशल डिस्टंन्स्िंगचे पालन न झाल्यास सक्षम प्राधिकारी त्वरीत असे दुकान, ठिकाण पुढील आदेशापर्यंत बंद करतील. उपस्थित नागरिक व दुकानदारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
वरील प्रमाणे व्यवसाय करण्यासाठी पासची आवश्यकता नाही.
सदर आदेश 31 मे रात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील.