महाराष्ट्र

अजब घटना! हायवेवर उडत आल्या 500 रुपयांच्या जळत्या नोटा

तिघेजण घेऊन जात होते २ कोटी रुपये कारच्या बॉनेटमधून

2 Feb :- अनेकदा प्रत्यक्ष आयुष्यात अशा काही अजब घटना घडतात, की विश्वास ठेवणं कठीण होतं. अशीच घटना मध्य प्रदेशात सिवनी-नागपूर महामार्गावर घडली आहे. रविवारी रात्री सिवनी-नागपूर महामार्गावर बनहानी गावाच्या लोकांनी पाहिलं, की एका कारमधून 500 रुपयांच्या जळत्या नोटा उडत आहेत. दरम्यान या प्रकारची माहिती कुणीतरी पोलिसांना कळवली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

पोलिसांच्या सांगण्यानुसार, कारच्या इंजिनातून धूर निघताना दिसला तसं कारमधल्या लोकांनी खाली उतरत लगोलग कारचं बॉनेट उघडत इंजिन तपासलं. त्याच वेळी जळालेल्या नोटा उडत रस्त्यावर पसरायला लागल्या. सिवनीच्या जिल्हा पोलिसांनी या प्रकरणात उत्तर प्रदेशात राहणाऱ्या तीन लोकांना अटक केली आहे. त्याच्याकडून 1.74 कोटी रुपयांच्या सुस्थितीतील नोटा जप्त केल्या आहेत.

या आरोपींचा दावा होता, की ते जवळपास २ कोटी रुपये कारच्या बॉनेटमधून घेऊन जात होते. कुराई पोलीस स्टेशनचे एसएचओ मनोज गुप्ता यांनी सगळा प्रकार सांगितला. गुप्ता यांच्या सांगण्यानुसार, कारमध्ये बसलेले लोक नोटा बॉनेटमध्ये लपवून घेऊन जात होते. रस्त्यात चेकिंग झाली तर पोलिसांना काही कळू नये हा त्यामागचा हेतू होता. मात्र इंजिनमध्ये आग लागली. या लोकांनी घाबरून बॉनेट उघडलं तशा अर्धवट जळालेल्या नोटा हवेत उडू लागल्या. हे पाहून पोलिसांनी स्थानिक लोकांना याची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोचण्याआधीच कारमधील लोक पळून गेले. मात्र हायवे पोलिसांनी त्यांना पकडलं.

स्थानिक लोकांपैकी कुणीतरी कारचा रजिस्ट्रेशन नंबर नोंदवून घेतला होता. हा नंबर मुंबईचा होता. यातले सुनील आणि न्यास हे जौनपूरचे तर तिसरा हरिओम हा आझमगढचा राहणारा आहे. आरोपींच्या सांगण्यानुसार ते इतकी रक्कम सोन्याचे दागिने विकत घेण्यासाठी घेऊन जात होते. बनारसहून मुंबईला निघालेले हे आरोपी याच रस्त्यानं परत येणार होते. पोलिसांनी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनाही याची माहिती दिली आहे.