बीड

मोठी बातमी! बीड जिल्ह्यात कोरोना अंडर कंट्रोल

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

2 Feb :- बीड जिल्ह्यात कोरोना चाचण्याचे वाढते प्रमाण आणि रुग्ण वाढीत पडत असलेली घट पाहता बीड जिल्ह्यात कोरोना विषाणूचे कहर आटोक्यात येत असल्याचे दिसून येत आहे. मात्र अधून मधून कोरोना रूग्णवाढीत होणारे चढ-उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज मंगळवारी 520 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 505 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे तर केवळ 15 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. अंबाजोगाई-2, आष्टी-1,बीड-8 तर परळी, केज येथे प्रत्येकी 2 कोरोना रुग्ण आढळले आहेत. रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे.