मोठी बातमी!, ‘या’ तारखेपासून चित्रपटगृह, नाट्यगृह पूर्ण क्षमतेनं होणार सुरु
चित्रपटगृहातील व्यवहार डिजिटल करण्याचे निर्देश
31 Jan :- कोरोना विषाणूच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून चित्रपटगृह आणि नाट्यगृहाची दारं बंद ठेवण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी चित्रपटगृह, नाट्यगृह ५० टक्के क्षमतेनं भरविण्यास परवानगी देण्यात आली होती. केंद्रीय गृहमंत्रालयाने पूर्ण क्षमतेनं १ फेब्रुवारीपासून चित्रपटगृह सुरु करण्यास परवानगी दिली आहे. गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतर माहिती व प्रसारण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
सध्या ५० टक्के क्षमतेनं सुरु असलेली चित्रपटगृह आणि नाट्यगृह १ फेब्रुवारीपासून पूर्ण क्षमतेनं सुरु होतील. कोरोना काळआत संसर्गाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृह, मल्टीप्लेक्स आणि नाट्यगृह ५० टक्के प्रेक्षकांच्या उपस्थित सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.व माहिती व प्रसारण मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. मंत्रालयाच्या एसओपीनुसार हॉल, वेटिंग रूम आणि सामान्य भागात आणि चित्रपटगृहाच्या बाहेरही लोकांमध्ये नेहमीच ६ फूट शारीरिक अंतर ठेवणं बंधनकारक असेल.
सभागृहात प्रवेश करणार्यांना संपूर्ण वेळ फेसकव्हर शिल्ड किंवा फेस मास्क घालणं आवश्यक आहे. हॉलच्या एन्ट्री आणि एक्झिट पॉईंटवर टच फ्री मोडमध्ये हँड सॅनिटायझर असणं सक्तीचं असेल. चित्रपट पाहण्यासाठी येणार्या लोकांना सूचनाही देण्यात आल्या आहेत. उदाहरणार्थ, खोकला किंवा शिंकताना त्यांना त्यांच्या चेहऱ्यावर विशेषत: तोंड आणि नाकावर टिश्यू पेपर किंवा रुमाल ठेवावा लागेल आणि येथे आणि तेथे टिश्यू पेपर टाकू नये, अशा सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
मार्गदर्शक सूचनांनुसार सिनेमा हॉलच्या आत किंवा बाहेर थुंकण्यास बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय, आरोग्य सेतू अॅप फोनमध्ये ठेवणे बंधनकारक असेल. प्रत्येक कार्यक्रमानंतर सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि थिएटर स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चित्रपटगृहातील व्यवहार डिजिटल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.