News

कापूस खरेदीचा वेग वाढवण्याचे उपनिबंधकांनी दिले आदेश

कापूस खरेदीचा वेग वाढवण्याचे उपनिबंधकांनी दिले आदेश 
आ.लक्ष्मण पवारांनी शेतक-यांसाठी केलेल्या उपोषणाला यश
गेवराई ,:- कोरोनोच्या पार्श्वभूमीवर गेवराई तालुक्यात शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.मोठ्या कष्टाने पिकवलेले पिकांला बाजारपेठ मिळाली नाही,त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतक-यांचे नुकसान झाले.आहे तसेच शेतक-यांचा कापुस घरातच पडून राहिला आहे.कारण कोरोनाचे कारण देत खरेदी केंद्रावर एक दिवसाला फक्त २० वाहानानाच कापूस खरेदी केंद्रात घेतला जात होता. म्हणून शेतकरी वैतागून गेले होते,त्यामुळे शेतक-यांनी आ.लक्ष्मण पवार यांची भेट घेऊन कापूस खरेदी केंद्रात दिवसाला फक्त २० वाहानेच खरेदी केंद्रात घेतली जात आहेत.त्यामुळे आमचा कापुस घरातच पडून राहिल तरी आपण लक्ष देऊन दिवसभरात जास्तीत जास्त खरेदी केंद्रावर कापुस खरेदी करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी  शेतक-यांनी आ.लक्ष्मण पवार यांच्याकडे केली होती.     त्या अनुषंगाने आ.लक्ष्मण पवार यांनी तहसील कार्यालयाला एक लेखी निवेदन देऊन १३ मार्च पर्यंत नोंदणी झालेला शेतक-यांचा कापूस लाॅकडाऊनच्या काळात विक्री होऊ शकला नाही.त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.तरी खरेदी केंद्रात किमान ५० पेक्षा जास्त वाहानांची संख्या वाढवून शेतक-यांच्या घरातील सर्व कापुस खरेदी केंद्रावर खरेदी करण्यात यावा नसता आपण २१ मे रोजी तहसील कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता.     त्याअनुषंगाने दि.२१ मे रोजी आ.लक्ष्मण पवार यांनी तहसील कार्यालयात जाऊन माझ्या मागणी प्रमाणे खरेदी सुरू करणार असाल तर आपण उपोषण स्थगित करू नसता,मी उपोषण करणारच अशी भुमिका घेऊन आ.लक्ष्मण पवार यांनी दि.२१ मे रोजी तहसील कार्यालया समोर भर उन्हात लाक्षणिक उपोषण सुर केले होते.यावेळी ना.तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी वरिष्ठ अधिकारी यांच्याशी चर्चा करून आ.लक्ष्मण पवार यांचे म्हणने सांगितले होते.त्यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गायकवाड यांनी आ.लक्ष्मण पवार यांच्याशी फोन वरून चर्चा करून  खरेदी केंद्रावर दररोज किमान ५० पेक्षा जास्त वाहाने खाली करून घेण्यासाठी आपण पाठपुरावा करू असा शब्द दिला होता.यावेळी प्रशासनाच्या वतीने ना.तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी तात्काळ वरिष्ठाकडे पाठपुरावा करून ३ ते ४ दिवसाची वेळ मागुन घेतली होती.तसे लेखी आश्वासन ना.तहसीलदार प्रशांत जाधवर यांनी आ.लक्ष्मण पवार यांना दिले होते.त्यानतंर आ.लक्ष्मण पवार यांनी उपोषण मागे घेतले होते.आ.लक्ष्मण पवार यांना दिलेल्या आश्वासन नुसार दि.२२ रोजी जिल्हा उपनिबंधक यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की,नोंदणी झालेल्या शेतक-याचा कापूस घरात राहू नये म्हणून दररोज ८० ते १०० कापसाचे वहाने खाली करून घेतले  जावेत असा आदेश पारित केला आहे.

One thought on “कापूस खरेदीचा वेग वाढवण्याचे उपनिबंधकांनी दिले आदेश

  • Adv. Tajuddin Shaikh Wadwanikar

    It is a very good decision taken by the Higher Rvenue Authority Honorable Rahul ji Rekhawar while nice controlling & observing the condition, situation of Beed District since last two months, taking More &more Hardwork as a chairman of commitee by day ,& night so our District was far away from coronavirus till 15/05/2020. Even then very nice situation is handled , this act is eligible to good Reward. So today s decision good nice & wiill be helpful to ordinary, common people. So tremendous job has been performed by Collector Rahul ji Rekhawar.

Comments are closed.