बीड

बीड कोरोना ब्रेकिंग! आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

31 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीत होणारे चढ-उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज रवीवारी 526 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 33 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अंबाजोगाई-14, आष्टी-1, बीड-12, परळी-5 तर केज- येथे 1 कोरोना रुग्ण आढळला आहे. नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे.