बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; जिल्ह्यात आज 26 जणांना कोरोनाची लागण

34 रुग्ण कोरोनामुक्त

30 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीत होणारे चढ-उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज शनिवारी 728 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापैकी 26 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत तर 34 रुग्णांना कोरोनामुक्तीची पावती भेटली आहे. अंबाजोगाई-3, आष्टी-2, बीड-9, परळी-1, गेवराई- 4, केज-2 , धारूर, माजलगाव, शिरूर येथे प्रत्येकी 1 कोरोना रुग्ण आढळला आहेत. नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे.