बीड

बीड कोरोना ब्रेकिंग; आज आढळले ‘इतके’ रुग्ण पॉझिटिव्ह!

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

29 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्येत रोज चढ-उतार पहायला मिळत आहेत. कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले की रूग्ण संख्येत मोठी भर पडत आहे आणि कोरोना चाचण्या कमी झाल्या की रुग्ण संख्या कमी येते. रूग्णवाढीत होणारे चढ-उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.


आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज केवळ शुक्रवारी 43 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि कोरोना संसर्ग टाळा.