बीड

केंद्र सरकारविरोधात कर सल्लागारांचा व व्यापारी संघटनांचा उद्या देशव्यापी एल्गार

जीएसटी कायद्यातील जाचक तरतूदीकडे सरकारचे दुर्लक्ष

28 Jan :- केंद्र सरकारच्या असंवेदनशील धोरणाचा निषेध म्हणून शुक्रवार दि. २९ रोजी भारतातील कर सल्लागार व व्यापारी संघटना सरकारविरोधात आंदोलन करणार आहेत. जीएसटी कायद्यातील अनेक जाचक तरतुदीमुळे व्यापाऱ्यांना व्यवसाय नकोसा झाला आहे वेळोवेळी सरकारकडे मागणी करून सुद्धा सरकार अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत नाही.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

उलट दिवसेंदिवस यातील नवनवीन तरतुदी करून समस्या आणखी जटिल करण्याचं काम अर्थमंत्रालय करत आहे.या बाबद शेवटचा पर्याय म्हणून देशभरात हे आंदोलन होत आहे. त्याच धर्तीवर बीड मध्ये सनदी लेखापाल व कर सल्लागार संघटना आणि व्यापारी संघटनेच्या वतीने केंद्रीय वस्तू व सेवाकर कार्यालयात व आयकर कार्यालय येथे शुक्रवारी सकाळी ११.३० वाजता निवेदन देण्यात येणार आहे.