बीड

बीड जिल्ह्यात आज 32 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

28 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीत होणारे चढ-उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी तोंडावर मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज गुरुवारी 646 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली यापकी 32 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. अंबाजोगाई-14, आष्टी-3, बीड-7, परळी-3, गेवराई- 2, केज-1 आणि शिरूर येथे 2 कोरोना रुग्ण आढळले आहेत. नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे.