News

दिल्ली हिंसाचार : जखमी पोलिसांच्या भेटीसाठी गृहमंत्री रुग्णालयात

नवी दिल्ली : २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनालाच शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅली दरम्यान घडून आलेल्या हिंसाचारात जवळपास ३०० हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या जखमी पोलिसांची भेट घेण्यासाठी आणि विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी रुग्णालयात दाखल झाले.

दिल्लीतील सुश्रुत ट्रॉमा सेंटर आणि तीर्थ राम रुग्णालय या दोन रुग्णालयांना अमित शहा भेट देत आहेत. या दरम्यान ते दिल्ली हिंसाचारात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची भेट घेतली.

सिव्हिल लाईन्स स्थित सुश्रुत ट्रॉमा सेंटरमध्ये पोहचल्यानंतर अमित शहा यांनी जखमी पोलिसांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी अमित शहा यांनी जखमींसोबत संवादही साधला.

त्यानंतर तीर्थ राम शाह रुग्णालयात दाखल असलेल्या जखमींचीही विचारपूस गृहमंत्री अमित शहा यांनी केली. सोबतच जखमींच्या कुटुंबाशीही संवाद साधला ट्रॅक्टर रॅली दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी जवळपास ३०० पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं.