बीड कोरोना ब्रेकींग; पुन्हा रुग्णसंख्येत मोठी वाढ
काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!
26 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख आता पुर्णतः घसरणीला लागला होता कोरोना चाचण्या अधिक प्रमाणात आणि रुग्णसंख्येत पडत असलेली मोठी घट जिल्हावासीयांना दिलासा देणारी होती. मात्र आज रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा उंचवला आहे.
रूग्णवाढीत होणारे चढ-उतार पाहता कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.
आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज केवळ मंंगळवारी 48 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. नागरिकांनी निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि कोरोना संसर्ग टाळा.