बीड

पोलीस अधीक्षक आर.राजा यांना राष्ट्रपती पदक

बीड पोलीस दलाच्या शिरपेचात मनाचा तुरा

पोलीस अधीक्षक आर. राजा यांना सोमवारी (दि.२५) राष्ट्रपती पदक जाहीर झाले. गडचिरोली येथे अपर अधीक्षक म्हणून कार्यरत असताना नक्षलवाद्यांविरोधात त्यांनी केलेल्या धडक कारवाईबद्दल त्यांना राष्ट्रपती पदक घोषित झाले आहे. पोलीस दलात स्वत:च्या जीवाची पर्वा न करता शौर्य गाजवणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने विविध पदकांनी गौरविण्यात येते. राष्ट्रपती पदक हे सर्वांत महत्त्वाचे मानले जाते.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

या पदकासाठी पोलीस अधीक्षक आर. राजा यांची निवड झाल्याने जिल्हा पोलीस दलाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.   गडचिरोली येथील सिरोंचामध्ये २०१८मध्ये नक्षलवाद्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. आर.राजा यांच्या नेतृत्वाखाली १५ कर्मचाऱ्यांची दोन पथके कारवाईसाठी गेले होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. यात तीन पोलीस जखमी झाले होते. दरम्यान, नक्षलवाद्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्यासाठी आर. राजा व सहकाऱ्यांनीही गोळीबार केला.

यामध्ये तीन नक्षलवादी पोलिसांच्या गोळीचा निशाणा ठरले होते. या शौर्याबद्दल आर. राजा यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. याबद्दल पो. अधीक्षक आर राजा हे पदक जाहीर झाल्यानंतर बीड जिल्हा पोईलीस दल तसेच बीडकारांमधून आभिनंदन होत आहे.