बीड

बीड जिल्ह्यात पुन्हा वाढू लागला कोरोनाचा कहर!

काळजी घ्या, कोरोना संसर्ग टाळा!

24 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख आता पुर्णतः घसरणीला लागला होता. मात्र आता पुन्हा कोरोनाचा कहर वाढू लागला आहे. महिला दोन-तीन दिवसांपासून कोरोना रुग्णवाढीत वाढ होत असल्याचे समोर येऊ लागले आहे.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज रवीवारी 687 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती यापैकी 40 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अंबाजोगाई-8, आष्टी-2, बीड 11, केज-4 , माजलगाव-३, पाटोदा- १, आणि शिरूर येथे 11 कोरोना रुग्ण आढळले आहेत .नागरिकांनी तोंडावर मास्क वापरावा आणि सोशल डिस्टन्सचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.