महाराष्ट्र

नांदेड जिल्ह्यात 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

अमानुष घटनेमुळे नांदेडमधील भोकर तालुक्यात उसळली संतापाची लाट

21 Jan :- नांदेड जिल्ह्यात चिड आणणारी संतापजनक घटना घडली आहे. अवघ्या ५ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. भोकर तालुक्यातील दिवशी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी बाबू संगेवार याला पोलिसांनी अटक केली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आरोपी बाबू हा सालगडी म्हणून गावात काम करत होता. शेतमालकाच्या मुलीवरच त्याने बलात्कार केला. त्यानंतर गळा दाबून तिची हत्या केली. या अमानुष घटनेमुळे भोकर तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.