कोरोनाची लस बनवणाऱ्या सीरम इंस्टीट्यूटमध्ये आगीचे तांडव
कोरोनाची लस सुरक्षित, कोव्हिशील्डच्या पुरवठ्यावर परिणाम नाही
21 Jan :- करोना आजाराला रोखण्यासाठी तयार केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लसीमुळे सध्या चर्चेत असणाऱ्या पुण्यातील सीरम इंस्टीट्यूटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याला आग लागली असून, मागील अडीच तासांपासून आग विझविण्याचे काम सुरुच आहे. अद्याप या घटनेत कुठल्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. सीरम इंस्टीट्यूटच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या आगीचा लस निर्मितीवर कुठलाही परिणाम झालेला नाही. तसेच, इमारतीमध्ये किती लोक आहेत, याची माहिती मिळू शकली नाही.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
मिळालेल्या माहितीनुसार, बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सीरम इंस्टीट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आज गुरुवारी दुपारच्या सुमारास आग लागली. सुदैवाने कोव्हिशील्ड लस सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे. ज्या इमारतीमध्ये लस निर्मितीचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी ही आग लागलेली नाही. कोव्हिशील्ड लस बनवली जात असलेली जागा सुरक्षित आहे.
कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग लागली आहे. परंतु, लसीची निर्मिती ही सीरम इन्स्टिट्यूटच्या जुन्याच इमारतीत करण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशील्ड लसीच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नसल्याची माहिती मिळत आहे. सीरम इंस्टिट्य़ुटने आतापर्यंत 1.5 अब्ज डोस विकल्या आहेत. हा एक विक्रम आहे. आकड्यांवर लक्ष घातल्यास जगातील 60% लहानग्यांना सरासरी सीरमचे एक व्हॅ्क्सीन आवश्य लागले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO) कडून मंजुरी मिळवलेल्या सीरमने 170 देशांना व्हॅक्सीनचा पुरवठा केला आहे. यात पोलिओ, डिप्थीरिया, टिटनेस, पर्ट्युसिस, HIV, BCG, आर-हॅपेटायटिस बी आणि रुबेला अशा व्हॅक्सीन्सचा समावेश आहे.