सिनेमा,मनोरंजन

अभिनेत्री बनवण्याचं आमिष दाखवणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

मुंबई पोलिसांनी उद्ध्वस्त केलं बॉलिवूडमधील सेक्स रॅकेट

20 Jan :- बॉलिवूडमधील Mee Too नंतर आता सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. अभिनेत्री किंवा मॉडेल होऊ इच्छिणाऱ्या तरुणींना आमिष दाखवून त्यांना वेश्या व्यवसायात ढकललं जातं होतं. हे रॅकेट पोलिसांनी सापळा रचून उद्ध्वस्त केलं आहे. Mee Too नंतर Bollywood पुन्हा हादरलं आहे. प्रेम नावाच्या एका व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती मिळाली. प्रेम हा फिल्म निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून काम करतो.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

अभिनेत्री आणि मॉडेल होऊ इच्छिणाऱ्या तरुणींना चांगली भूमिका देण्याचं आमिष दाखवून जबरदस्ती वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडत होता. जाहिरात, वेब सीरिज आणि फिल्ममध्ये काम करणाऱ्या तरुणींना तो टार्गेट करत होता.


रॅकेटबाबत माहिती होताच पोलिसांनी सापळा रचून आरोपींना पडलं आहे. बुधवारी मुंबई क्राइम ब्रांचनं ही कारवाई केली आहे. तीन जणांना अटक करण्यात आली आहे. प्रेमसह दोन महिलांचा यात समावेश आहे. त्यांनी इतर 8 महिलांनादेखील यासाठी प्रवृत्त केलं. या महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे.