चाकूचा धाक दाखवून तरुणीवर केला बलात्कार
आरोपी जुनैद खान फरार
20 Jan :- जयपूरवरून आपली कौटुंबिक मालमत्ता विकण्यासाठी नागपुरात आलेल्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जुनैद खान याने चाकूच्या धाकावर तरुणीवर बलात्कार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे बलाकाराच्या गुन्ह्यात आरोपीची पत्नी आणि मित्रही सहभागी होते. घटनेचा मुख्य आरोपी जुनैद खान सध्या फरार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी 16 जानेवारीला नागपुरात आली होती.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
तरुणी जाफरनगर भागात तिच्या जरीन नावाच्या मैत्रिणीच्या घरी थांबली होती. मैत्रिणीचा पती जुनैद खान हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्या नावावर याआधीच अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन दिवसांपूर्वी पहाटे 4 वाजता पीडित तरुणी मैत्रिणीच्या घरी एका खोलीत झोपलेली असताना जुनैद खानने चाकूच्या धाकावर पीडित तरुणीवर बलात्कार केला. धक्कादायक बाब म्हणजे घटनेच्या वेळी तरुणीचा आवाज खोलीच्या बाहेर जाऊ नये यासाठी जुनैद खानची पत्नी आणि सहकाऱ्याने जोराजोरात गाणं वाजवलं.
सकाळी कसंतरी आपली सुटका करून घेत तरुणीने नागपुरातील एका हॉटेलमध्ये आश्रय घेतला आणि तिथून पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांना फोनवर संपर्क साधत घडलेले प्रकार सांगितला. पोलिसांनी या प्रकरणात तरुणीची वैद्यकीय चाचणी करून घेत आरोपी जुनैद खान याच्या विरोधात बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. तर त्याची पत्नी जरीन आणि सहकारी सोनू विरोधात बलात्कारात त्याला मदत केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. जुनैद खान फरार झाला असून त्याची पत्नी जरीन आणि सोनूला पोलिसांनी अटक केली आहे.