बीड

भीषण अपघात! नगर-बीड महामार्गावर वऱ्हाडाची ट्रॅव्हल्स पलटली

बसमधील 20 जण जखमी

18 Jan :- सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास वहाडाची ट्रॅव्हल्स पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात वीस जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण येथून जामखेड तालुक्यातील पिंपळगाव येथे लग्नासाठी वऱ्हाडी बावधन ट्रॅव्हल्स (MHOS Dk 6125) मधून आले होते.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

सोमवारी लग्नाचा कार्यक्रम उरकुन परत कल्याणकडे जाताना रात्री आठ वाजता ट्रॅव्हल्स रस्त्यावर पलटी झाली. अपघातात बसमधील 20 जण जखमी झाले. विघ्लेस श्रावण बनसोडे, महेर श्रवण बनसोडे, श्रवण बनसोडे, कवू भगवान कांबळे, चंची श्रावण बनसोडे, शशिकांत जाधव, विलास डाडर,राजाबाई डाडर, सुनील पवार, सुनीता जाधव, अजय जाधव, धोंडबाई जाधव, बाळू कसबे विराज जाधव, पवन जाधव, कालिंद जाधव, अनिकेत जाधव, कनिराम राठोड (चालक), सुनील पवार. ही जखमी झालेल्यांची नावे आहेत.