महाराष्ट्र

मोठी बातमी! ‘या’ कारणामुळे लसीकरण रद्द

रविवारी, सोमवारी लसीकरण होणार नाही

16 Jan :- कोव्हिड-19 लसीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या कोविन अॅपमध्ये गोंधळ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “रविवारी (17 जानेवारी) आणि सोमवारी (18 जानेवारी) लसीकरण होणार नाही. कोविन अॅपमध्ये झालेल्या गोंधळामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

केंद्र सरकारने ऑफलाइन लसीकरणी करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत.” शनिवारी कोविन अॅपमध्ये गडबडीमुळे लसीकरणासाठी डॉक्टरांना उशीरा मेसेज गेल्याचं राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी मान्य केलं होतं. मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, कोविन अॅपची तांत्रिक समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लसीकरण मोहिमेदरम्यान कोविन अॅपमध्ये तांत्रिक समस्या दिसून आल्या. केंद्र सरकारकडून ही समस्या दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कोविन अॅपमधील गोंधळामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणासाठी फोन करून माहिती देण्यात आली होती. आरोग्य विभागाकडून राज्यात लसीकरण मोहीम सुरू राहील का, याबाबत अजूनही माहिती मिळू शकलेली नाही.