महाराष्ट्र

10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता असल्याचे शिक्षणमंत्री

16 Jan :- दरवर्षी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरु होतात. मात्र, यंदा कोरोना महामारीमुळे या परीक्षा कधी होणार? अभ्यासक्रम किती असणार? असे असंख्य प्रश्न विद्यार्थी आणि पालकांच्या मनात आहेत. या सर्वांना दिलासा देत 10 वी आणि 12 च्या परीक्षेबाबत लवकरच योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी कोल्हापुरात दिली आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

9 ते 12 वी वर्ग सुरू करताना जी काळजी घेतली तिच काळजी यावेळी देखील घेतली जाणार असून 10 दिवसात सगळी तयारी करण्यात येणार आहे. 15 ते 16 लाख विद्यार्थी सध्या वर्गात आहेत. मात्र, कुणाला कोरोना लागण झाली नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. 2025 पर्यंत शाळांची गुणवत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय शाळेत इंटरनेट पोहचवलं जाईल. माझं शिक्षण माझं भविष्य, ही शिक्षण क्षेत्रातील नवीन टॅगलाईन असल्याचेही वर्षा गायकवाड म्हणाल्या.