मोठी बातमी! बीडमध्ये ‘या’ 6 ठिकाणी मिळणार ‘कोरोना लस’
बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाला लसींचे डोस उपलब्ध
13 Jan :- कोरोनावर मात करणाऱ्या लसीचा शोध घेण्यात भारताला यश मिळाल्यानंतर आता १६ जानेवारीपासून महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे. लसीकरणाच्या या पहिल्या टप्प्यात बीड जिल्हा आरोग्य प्रशासनाला १७ हजार ६४० लसींचे डोस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकिशन पवार यांनी ही माहिती दिली. बीड जिल्हयात एकूण ६ ठिकाणी कोविड लस दिली जाणार आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई, जिल्हा रुग्णालय बीड, उप जिल्हा रुग्णालय परळी वै..उप जि.रु.गेवराई,उप जि.रु केज,ग्रा.रु.आष्टी ही ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
प्रत्येक सत्राच्या ठिकाणी प्रति दिन १०० आरोग्य कर्मचाऱ्यांना डोसेस दिले जाणार आहेत. कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण १०० टक्के पूर्ण करण्यात आले आहे. लस साठवण क्षमता ३६८ लीटर किंवा २६४९७५० डोसेस इतकी आहे. ज्यांनी अविरत सेवा बजावली अशा आरोग्य विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यासाठी १७ हजार कोव्हिड लसीची मागणी जिल्हा आरोग्य विभागाने नोंदवलेली होती. बीड जिल्ह्यासाठी कोव्हिड लस बुधवारी बीड येथे उपलब्ध झाली. प्रत्यक्षात १७ हजार ६४० लसीचे डोस उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
याबाबत डॉ. राधाकिशन पवार म्हणाले, बीड जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात १६ जानेवारीपासून लसीकरण करण्यात येणार आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यासोबतच ज्यांना प्राधान्याने लस देणे आवश्यक आहे अशा सर्वांचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले असून को-वीन अॅपमध्ये अगोदरच आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची नोंदणी करण्यात आली आहे. लसीकरण प्रक्रिया नियोजनबद्ध पार पडावी यासाठी नुकताच बीड, वडवणी आणि परळी येथे ड्राय रन घेण्यात आला.
या माध्यमातून लसीकरणाची रंगीत तालीमच घेण्यात आली. त्यानंतर आता प्रत्यक्षात कोरणा लस्सी करण्यासाठीचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. बीड जिल्ह्याला मिळणारा कोरोना लसीचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी ७५ ठिकाणी शीतगृह तयार करण्यात आले आहेत. ग्रामीण रूग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी प्रशिक्षित आरोग्यकर्मचार्यांकडून लसीकरण केले जाणार आहे.