नातवांनी पुरवला आजोबांचा हट्ट, 88 व्या वाढदिवसाला थेट दारात आणलं असं काही अख्खा गाव झाला चकित
संगमनेर, 12 जानेवारी : बालहट्ट आणि स्त्रीहट्टाच्या कथा व महती आपण ऐकत असतो. इथं मात्र नातवानं आजोबांचा पुरवल्याची सत्यकथा घडली आहे. आजोबांच्या 88 व्या वाढदिवसाला नातवाने त्यांना जी अनोखी भेट दिली, त्यामुळे सगळा गाव चकित झाला आणि त्याची चर्चा आता महाराष्ट्रभर रंगली आहे.
संगमनेर तालुक्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे आजोबा-नातवाच्या (grandfather and grandchild) चर्चा महाराष्ट्रात रंगल्या आहेत. सकाळनं दिलेल्या वृत्तानुसार, संगमनेरच्या (sangamner) तळेगाव पट्ट्यातील चिंचोली गुरव इथं घडलेली ही घटना. दोन दिवसापासून या गावातील एका मोकळ्या जागेवर लगबग सुरू होती. मंडप घातला होता. सोबत मोठ्या वर्तुळाला शेणानं सारवत तिथं एच हे अक्षर काढलं होतं. कुणीतरी बडी हस्ती (celebrity) गावात येणार की काय अशा चर्चा त्यामुळं रंगल्या होत्या.
दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता विमानाची घरघर ऐकू आल्यानं सगळया गावाच्या नजरा आकाशाकडे लागल्या. आकाशातून एक हेलिकॉप्टर (helicopter) मोठा धुळीचा पडदा उभारत खाली जमिनीवर झेपावलं. त्यातून उतरलेल्या आजी-आजोबांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता.
या गावातील वकील (advocate) अविनाश गोडगे आणि डॉ. नंदकुमार गोडगे यांनी आपल्या आजोबांच्या 88 व्या वाढदिवसाला (birthday) ही जगावेगळी भेट दिली. आजोबाची कधीपासून मनी धरलेली हौस पुरवली गेल्यानं ते अक्षरश: धन्य झाले. नातवांनी मोठ्या प्रयत्नांनी गावात हेलीपॅडही उभारलं.
यासाठी दोघाही नातवांनी मोठंच नियोजन करत पुण्याहून आजोबा-आजींना कार्यक्रमाच्या ठिकाणी गावात चिंचोली गुरव इथं आणलं. आजोबा देवराम गोडगे आणि त्यांच्या पत्नी चहाबाई यांच्यासह आयुष्यातला पहिलावहिला विमानप्रवास करत झोकदार जन्मदिवस साजरा केला.
विशेष म्हणजे, याच आजोबांनी नातू नंदकुमार याची त्याच्या लग्नात थेट हत्तीवरून मिरवणूक काढली होती. आता नातवानंही आजोबांच्या परतफेडच केली आहे. वाढदिवसावेळी निवृत्ती इंदोरीकर यांच्या कीर्तनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. गावकऱ्यांसह सगळ्या पंचक्रोशीला या आजोबा-नातवाच्या प्रेमाचं मोठंच कौतुक वाटलं.