भारत

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीचा जबरदस्त अपघात

पत्नीचा जागीच मृत्यू

11 Jan :- केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीचा अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या अपघातात त्यांच्या त्यांच्या पत्नी विजया नाईक यांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक हे गाडीने प्रवास करीत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापुरा येथे ही घटना घडलीय. उत्तरा कन्नड जिल्ह्यातील यल्लापुराजवळ केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांची गाडी पलटी झाली. ते उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत प्रतिनिधित्व करतात.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

कर्नाटकातील अंकोला तालुक्यातील होसाकंबी गावातून प्रवास करता श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला. त्यांची गाडी पलटल्याचे सांगितले जात आहे. ते यालपुराहून गोकर्ण येथे प्रवास करीत होते. त्यांच्या पत्नीला या अपघातात गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर त्यांची पत्नी बराच काळ बेशुद्ध राहिली, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर गोव्यात उपचारासाठी योग्य ती व्यवस्था करावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना फोन केलाय. श्रीपाद नाईक आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी आणि संरक्षण राज्यमंत्री आहेत.