News

धक्कादायक! बीड शहरात शिवदारा रोडवर मर्डर

बीड – बीड शहरानजीक असलेल्या चर्हाटा फाटा परिसरातील शिवदरा रस्त्यावर प्रकाश गायकवाड या तरुणांचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याची घटना पहाटे घडली .या घटनेने शहरत एकच खळबळ उडाली आहे .

शिवदरा रस्त्यावर असलेल्या डोंगर आणि मोकळया जागेत अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना पहाटे मिळाली .घटनास्थळी भेट दिली असता त्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून आणि दगडाने ठेचून त्याचा खून करण्यात आल्याचे दिसून आले .

मयत हा प्रकाश गायकवाड नावाचा व्यक्ती असून खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होता .अंकुश नगर भागात राहणाऱ्या प्रकाश चा खून कोणी केला असावा याचा तपास लावण्यासाठी पोलीस पथके तैनात करण्यात आली असून स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि भारत राऊत यांनी घटनास्थळी भेट दिली आहे .