महाराष्ट्र

मोठी बातमी! कोरोना लसीकरणासाठी महाराष्ट्र सज्ज

पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्यसेवकांना लस

9 Jan :- देशभरात येत्या 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्व राज्यात जय्यत तयारी केली जात आहे. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस दिली जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. “राज्यात कोरोना लसीकरणाची संपूर्ण तयारी झाली आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात 8 लाख आरोग्य सेवकांना लस देऊ. ज्या क्षणाला केंद्र सरकार लसीची उपलब्धता करून देईल. त्यानंतर लगेचच आम्ही लसीकरण सुरु करु. यासाठी कोल्ड चेन ही तयार आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

काही कमतरता असेल तर ती दूर करु,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल.

यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे. कोरोनाच्या लसीकरणासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. येत्या 16 जानेवारीपासून देशभर कोरोना लसीकरण होणार आहे. केंद्र सरकारने यासंबंधी घोषणा केली आहे. यामध्ये सगळ्यात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि अग्रभागी काम करणाऱ्या कामगारांना लस दिली जाईल. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, अंदाज 3 कोटी कामगारांना आधी लस दिली जाणार आहे. त्यानंतर 50 वर्षांवरील आणि 50 वर्षांखालील लोकसंख्या असलेल्या सहकारी गटाला लस दिली जाईल. यामध्ये तब्बल 27 कोटी नागरिकांचा समावेश असणार आहे अशी माहिती केंद्राकडून देण्यात आली आहे.