नव्या कोरोनाचा कहर सुरु; या देशात लॉकडाऊन लागू!
नव्या कोरोनाने परिस्थिती बनली अधिक बिकट
5 Jan :- ब्रिटनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव नव्याने वाढायला लागल्याने तिसऱ्यांदा लॉकडाऊन लागू केला गेला आहे. पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांनी नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. करोनाच्या साथीमुळे ब्रिटनच्या आरोग्य व्यवस्थेवर अतिरिक्त ताण आला आहे. हा ताण अधिक वाढू नये यासाठी आपणच काळजी घ्यावी, असे आवाहनही जॉन्सन यांनी केले आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
देशात करोना विरोधी लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे करोना विरोधी लढ्यासाठी काही कठोर उपाय योजना लागू करणे आवश्यक आहे. तसा निर्णय घेतला जाण्याचे सूतोवाच जॉन्सन यांनी दोनच दिवसांपूर्वी केले होते. आपल्या दैनंदिन वेळापत्रकामध्ये आणि कमकाजामध्ये खंड पाडणे किती अवघड आहे, याची आपल्याला कल्पना आहे.त्यामुळे नागरिकांना किती त्रास होतो आहे, हे आपल्याला माहिती आहे. विषाणू विरोधात लढण्यासाठी सरकारकडून यापूर्वीच नागरिकांना अनेक सूचना दिल्या गेल्या आहेत. मात्र तरिही आता आपल्याला याच स्थितीला तोंड द्यावे लागणार आहे, असे जॉन्सन यांनी ट्विटरवरच्या पोस्टमधये म्हटले आहे.
ब्रिटनम्ध्ये करोना विषाणूचा नवीन प्रकार आढळल्याने परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. मात्र वैज्ञानिकांनी उपलब्ध करून दिलेल्या लसीमुळे आता करोना प्रतिबंध शक्य होईल. लसीची प्रतिक्षा आता समाप्त झाली आहे. मात्र तरिही नागरिकांनी स्वतःला आणि इतरांचेही संरक्षण व्हावे, यासाठी घराबाहेर पडू नये, असे जॉन्सन यांनी म्हतले आहे.
ब्रिटनमध्ये सोमवारपासून ऑक्सफोर्ड ऍस्ट्राझेनेका लसीच्या लसीकरणाला प्रारंभ झाला. याशिवय फायझर बायोटेकच्या लसीलाही ब्रिटनमध्ये मंजूरी दिली गेली आहे. नवीन उपाय योजनांनुसार स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंडमध्ये लॉकडाऊन सुरू होणार आहे. युनायटेड किंगडमचा भाग असलेल्या अन्य दोन भागांमध्ये यापूर्वीच लॉकडाऊन लागू केलेला आहे.