बीड

बीड जिल्ह्यातून आज 30 रुग्ण पॉझिटिव्ह तर 17 कोरोनामुक्त

बीड जिल्ह्याचं आतापर्यंतच सविस्तर कोरोना अपडेट!

5 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत चढ-उतार पाहिला मिळत आहे. कोरोना चाचण्या अधिक प्रमाणात आणि रुग्णसंख्येत पडत असलेली मोठी घट जिल्हावासीयांना दिलासा देणारी आहे.रूग्णवाढ घटत असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज मंगळवारी केवळ 30 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 17 रुग्ण कोरोनामुक्त झाली आहेत.अंबाजोगाई- 11, आष्टी- 4, बीड- 10, परळी- 2, शिरूर- 1, वडवणी-२ येथे कोरोना रुग्ण आढळली आहेत. कोरोना रुग्णवाढ आटोक्यात येत असली तरी नागरिकांनी मात्र तोंडावर मास्क लावणे आणि सोशल डिस्टन्स ठेवणे आत्यावश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.