राज्यात नव्या कोरोनाचा शिरकाव; 8 प्रवाशांमध्ये नव्या कोरोनाची लक्षणे
आरोग्यमंत्री राजेश टोपे इणनी दिली माहिती
4 Jan :-कोरोना विषाणूच्या थैमानला थोपवता थोपवता नाकी नऊ आलेत. आता नव्या कोरोनाचा राज्यात शिरकाव झाला असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोना व्हायरसच्या नवीन स्ट्रेनने महाराष्ट्रातही शिरकाव केला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
ब्रिटनमधून परतलेल्या राज्यातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ब्रिटनमधून परतलेल्या या 8 प्रवाशांपैकी 5 जण मुंबईतील असून पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. सध्या या सर्वांना विलगीकरणात ठेवले असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.