धक्कादायक! केजमध्ये महिलेला तोंड दाबून शेतात फरफटत नेवून केला अत्याचार
केज पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला गुन्हा
4 Jan :- बीड जिल्ह्यात कधी काय होईल याचा नेम नाही. बीड जिल्ह्यात महिलेवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. अशीच एक धक्कदायक घटना केज तालुक्यात घडली आहे. केज तालुक्यातील डोणगाव येथे एका आदिवासी महिलेवर शेतात तोंड दाबून फरफटत नेवून अतिप्रसंग झाल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी केज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत करीत आहेत. पिडित महिलेने दिलेल्या फिर्यादी वरुन, दि.२८ रोजी आरोपी बाळू वैजेनाथ घुले याने रात्री ९.३० ते १०.३० दरम्यान शेतातील पिडितेच्या घराची कडी वाजवली. शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेला पती परत आल्याचे समजून पिडितेने दार उघडले. यानंतर आरोपीने पती कुठे गेला असे विचारले. पती पिकाला पाणी देण्यास गेल्याचे सांगताच तू मला आवडतेस म्हणत पिडितेला शेजारील शेतात तोंड दाबून फरफटत नेवून अतिप्रसंग केला.
सदरील प्रकार कोणाला सांगितले तर पती मुलासह मारुन टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी पिडित आदिवासी महिलेच्या तक्रारी वरुन बलात्कारासह अॅट्रासिटीचा गुन्हा दि.३ रविवारी नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी भास्कर सावंत करत आहेत.