महाराष्ट्र

बळीराजाची धाकधूक वाढली; येत्या काही दिवसांत ‘या’ ठिकाणी पडणार जोरदार पाऊस

पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली

4 Jan :- गेल्या वर्षभरामध्ये वारंवार होणारे हवामानातील बदल आपण सगळ्यांनीच पाहिले. आताही हवामान खात्याच्या अंदाजामुळे बळीराजाच्या धाकधूक आणखी वाढली आहे. राज्यात गेल्या महिन्याभरापासून थंडीला सुरवात झाली आहे. पण पुन्हा एकदा अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आज सकाळपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पुढचे काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण असून अनेक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

आताही औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यात तुरळक पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्यामुळे हवेतला गारवा कमी झाला. अशा अवेळी पावसामुळे रब्बी पिकांना पुन्हा फटका बसला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात अडकला आहे. हेच वातावरण पुढचे काही दिवस असणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. राज्यात 6 ते 7 जानेवारीला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात हलक्या सरींच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसंच महाराष्ट्रातील किमान तापमानात येत्या 3 ते 4 दिवसांत घट होण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे राज्यासह संपूर्ण उत्तर भारतात मोठ्या प्रमाणात थंडी पडली आहे. संपूर्ण उत्तर भारत थंडीमुळे गारठला आहे.आज मुंबई, नवी मुंबई, सांताक्रुझ परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. मुक्ताईनगर तालुक्यात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण आहे. रिमझिम पाऊस सुरू असल्यामुळे रब्बी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. रविवारी सकाळी दिल्लीत हलक्या सरींचा पाऊस झाला. पावसामुळे दिल्लीत धुरके नाही, परंतु थंडी वाढली आहे. दिल्लीत पहाटे 11.30 ते दुपारी अडीच वाजेपर्यंत पाऊस पडला.

हवामान खात्याच्या माहितीनुसार दिल्लीतील सफदरजंग भागात 6.6 मिमी, पालममध्ये 1.5 मिमी, लोधी रोडला 8 मिमी आणि आयनगरमध्ये 6 मिमी पाऊस पडला. सततच्या ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे निम्म्यापेक्षा अधिक कांद्याचे रोप खराब झाले तर लागवड केलेला उन्हाळ कांद्यावर मावा, करपा या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढत चालला असून मोठ्या प्रमाणावर कांदे मरत आहे. कांद्यावर केलेला खर्चही निघनार नसल्याने अखेरीस नाशिक देवळा तालुक्यातील खामखेडा इथल्या शेतकरी समाधान आहेर यांनी आपल्या पाच एकर क्षेत्राकर नुकतीच लागवड केलेल्या कांदा पिकात मेंढ्या सोडून आपला संताप व्यक्त केला आहे.