बीड

5 वी ते 8 वी वर्गाच्या शाळा सुरु करण्याबाबत शिक्षणमंत्र्यांनी दिली माहिती

शाळा सुरु करण्याबाबत पालकांमध्ये उत्सुकता

4 Jan :- कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जवळपास १० महिने राज्यातील शाळा बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत आणण्यासाठी राज्यसरकार टप्प्याटप्प्याने अनलॉक करत आहे. राज्य पुन्हा एकदा स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे जवळपास १० महिने राज्यातील शाळा बंद आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्यानंतर विस्कळीत झालेले जनजीवन पूर्ववत आणण्यासाठी राज्यसरकार टप्प्याटप्प्याने अनलॉक करत आहे.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

राज्य पुन्हा एकदा स्थिरतेकडे वाटचाल करत आहे. अनलॉकच्या टप्प्यात राजसरकाराने शाळा सुरु करण्याबबाबतचा निर्णय २३ नोव्हेंबरला स्थानिक प्रशासनावर सोपविला आहे.यामध्ये इयत्ता नववी ते १२ पर्यंतच्या शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेतल्यानंतर आता राज्यातील आठवी ते नववी पर्यंतच्या शाळा कधी सुरु होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे.अशातच राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज ट्विट करत इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंतचे वर्ग कधी सुरु होणार याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरुन माहिती देताना म्हटले आहे की, “यंदा इयत्ता १२वी ची परीक्षा १५ एप्रिलनंतर आणि इयत्ता १० वी ची परीक्षा ही येत्या १ मे नंतर घेण्याच्या विचार करीत आहोत. आरोग्य अधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून इयत्ता पाचवी ते आठवीसाठी शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार करीत आहोत. लवकरच निर्णय घेऊ.”

दरम्यान, नाशिक, पुणे, औरंगाबाद आणि पालघर या चारही जिल्ह्यांतील इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा आजपासून (दि. ४) सुरु होत आहेत. कोरोनाकाळात शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे आता प्रदीर्घ काळानंतर शाळा सुरु होत आहेत. दरम्यान, मुंबई महापालिका हद्दीतील शाळा १५ जानेवारीपर्यंत बदच राहणार आहेत.