DCGI कडून कोरोनाच्या 2 लशींना मंजुरी, पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…
नवी दिल्ली, 03 जानेवारी : भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड लस आणि सीरम संस्थेनं तयार केलेल्या लशीला DCGIनं आज सशर्त आपत्कालीन वापरासाठी अखेर मंजुरी दिली आहे. आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन DCGI कडून निवदेन देण्यात आलं. 70 टक्क्याहून अधिक ही लस परिणामकारक असल्याचं चाचण्यांच्या अहवालातून समोर आलं आहे. DCGIनं परवानगी दिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून पहिली प्रतिक्रिया केली आहे.
‘भारत आत्मनिर्भर होत आहे. कोरोनाच्या दोन लशींना नुकतीच DCGI कडून परवानगी मिळाली आहे. आपल्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन! भारतीयांचं अभिनंदन आणि आपल्या शास्त्रज्ञांनी केलेल्या मेहनतीबद्दल अभिनंदन. या लशीमध्ये स्वदेशी लस आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हिशिल्ड लस आहे.’ भारत आत्मनिर्भतेच्या दिशेनं जात असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे
आपत्कालीन वापरासाठी मान्यता देण्यात आलेल्या दोन लसी भारतात तयार झाल्या आहेत याचा प्रत्येकाला अभिमान वाटेल! काळजी आणि करुणेचे मूळ असलेल्या आत्मानिर्भर भारतचे स्वप्न आपल्या वैज्ञानिकांनी पूर्ण केलं असल्यांचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे. पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिक आणि भारतीय वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे.
कोरोनाच्या लशीला DCGIनं सशर्त मंजुरी दिल्यानंतर भारतात आनंदाचं वातावरण आहे. लवकरात लवकर ही लस यावी आणि प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचावी असा नागरिकांनी विश्वास व्यक्त केला आहे. DCGI नं दिलेल्या सीरमने दिलेल्या अहवालामध्ये ही लस 70 टक्के यशस्वी झाल्याचं म्हटलं आहे. आपत्कालीन परिस्थिती मंजूर झाली, क्लिनिकल चाचणी अद्यापही चालू आहे. तर भारत बायोटेकनं तयार केलेल्या लशीचे मागच्या दोन महिन्यात कोणतेही दुष्परिणाम आढळून आले नाहीत अशी माहिती समोर आली आहे.