मोठी बातमी! केवळ ‘यांनाच’ मिळणार मोफत कोरोना लस
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केली घोषणा
देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आज कोरोना लशीचं ड्राय रन सुरु झालं आहे. यातच देशाचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी संपूर्ण देशभरात कोरोना लस मोफत देण्यात येणार असल्याचं म्हटलं. मात्र या घोषणेनंतर त्यांनी केलेल्या ट्वीटमुळं पुन्हा मोफत कोरोना लसीबद्दल संभ्रम झाला आहे.
‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस
दिल्लीमध्ये पत्रकारांनी त्यांना दिल्लीप्रमाणं देशातील सर्व राज्यात कोरोना लस मोफत देणार का? असा सवाल केला असता डॉ हर्षवर्धन म्हणाले की, कोरोना लस दिल्लीतच नाही तर सर्व देशात मोफत दिली जाणार आहे. मात्र या घोषणेनंतर काहीवेळाने डॉ हर्षवर्धन यांनी एक ट्वीट केलं. त्यात त्यांनी सांगितलं आहे की, 1 कोटी आरोग्य सेवक आणि 2 कोटी आघाडीचे कोरोना योद्धे यांनाच देशभरात कोविड प्रतिबंधक लस मिळणार आहे. जुलैपर्यंत उर्वरित 27 कोटी जनतेच्या लसीकरणाचा निर्णय घेतला जाणार आहे.