क्रीडा

मोठी बातमी! सौरभ गांगुलीला हृदयविकाराचा झटका

क्रिकेट विश्वाला मोठा धक्का!

2 Jan :- भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि BCCIचा अध्यक्ष सौरव गांगुली याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं प्रसिद्ध केलं. त्याच्यावर आज सांयकाळी angioplasty होणार आहे. गांगुलीनं नुकताच त्याच्या मुलीसोबत जाहीरात केल्याचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. त्या जाहीरातीची चर्चा असताना या बातमीनं क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. गांगुलीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

जीममध्ये कसरत करताना त्याच्या छातीत दुखू लागले आणि त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले.भारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. आरे ला कारेनं उत्तर देण्याच्या त्याच्या शैलीनं टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांना भिडण्याची ताकद दिली. २००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर लॉर्ड गॅलरीत गांगुलीनं जर्सी काढून केलेलं सेलिब्रेशन आजही सर्वांच्या लक्षात आहे.