बीड कोरोना ब्रेकिंग! रुग्णसंख्येत ‘मोठी’ वाढ!!
रुग्णवाढीत चढ-उतार कायम
2 Jan :- बीड जिल्ह्यात कोरोनाचा आलेख आता पुर्णतः घसरणीला जात असताना आज अचानक पुन्हा रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. काल केवळ 17 रुग्ण बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह आढळली होती मात्र आज मोठी वाढ झाली आहे.
रूग्णवाढ घटत असली तरी कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही, म्हणून नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि सोशल डिंस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.
आताच आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार संपूर्ण बीड जिल्ह्यात आज शनिवाारी तब्बल 44 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. निष्काळजीपणा करू नए असे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्यामुळे काळजी घ्या आणि कोरोना संसर्ग टाळा.