सिनेमा,मनोरंजन

मुन्नाभाईच घोडं नक्की कुठे अडलंय?

अर्शद वारसीने दिली माहिती

29 Dece :- 2003 मध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट मुन्नभाई M.B.B.S हा चित्रपट सिनेरसिकांना जाम डोक्यावर उचलला होता. मामू कुछ भी हो टेंशन नही लेने का, बोले तो, जादू कि झप्पी देना अशी अनेक संवाद आजही सिनेरसिकांना तोंडपाठ आहेत. या चित्रपटातील एक सुद्धा सीन कोणीही विसरलेलं नाही. मुन्ना आणि सर्किटच्या जोडीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यानंतर 3 वर्षांनी अर्थात 2006 मध्ये लगे रहो मुन्नाभाई प्रदर्शित झाला आणि पुन्हा मुन्नाभाई- सर्किटची जोडी सुपरहिट ठरली.

‘दै.झुंजारनेता’ वर क्लिक करा आणि मिळवा ‘वॉटसअँपवर’ लाईव्ह अपडेटस

लगे रहो मुन्नाभाई चित्रपटातील गांधीगिरी प्रेक्षकांनी प्रचंड प्रमाणात पसंत केली. आता मुन्नाभाईचा तिसरा भाग कधी येणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. मग मुन्नाभाई 3 ला एवढा वेळ का लागत आहे असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याबाबत अर्शद वारसीने बातचीत करताना सांगितलं की, ‘या सिनेमाच्या 3 स्क्रिप्ट तयार आहेत. पण सिनेमाचं शूटिंग कधी सुरू होणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती नाही.’ दिग्दर्शक राजू हिरानी आणि निर्माते विदू विनोद चोप्रा याबद्दल काहीच बोलयला तयार नाहीत.

फेब्रुवारी महिन्यात चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल चर्चा रंगल्या होत्या. पण त्यानंतर लॉकडाऊन सुरू झाला आणि संजय दत्तला कॅन्सर झाल्याचं उघडकीस आलं त्यामुळे सिनेमाबद्दल काहीच अपडेट्स आल्या नाहीत. हा सिनेमा होईल की नाही याबद्दलच काही शाश्वती नसल्याचं चक्क अर्शद वारसीने सांगितलं आहे. 2 चित्रपट चांगले चालल्यानंतर तिसऱ्या सिनेमाचं घोडं नक्की कुठे अडलंय? असा प्रश्न अनेक चाहत्यांना पडला आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार की, अर्शदचं म्हणणं खरं होणार हे येणारा काळच ठरवेल.